विद्यार्थी-1
किशोर नानाजी शेवाळे
मी किशोर नानाजी शेवाळे रा. मोकभणगी ता. कळवण जि. नाशिक मनोगत व्यक्त करतो की, माझे वडील पी.डब्लु. डी. मध्ये मैलबिगारी होते. अचानक त्यांचा मृत्यु झाला.
मी पोरका झालो. त्यानंतर मी संस्थेत आर्कीटेक्ट ड्रॉप्समन हा २ वर्षे मुदतीचा अभ्यासक्रम पुर्ण केला व अनुकंपा तत्वाखाली चांदवड ता. चांदवड जि. नाशिक येथे पंचायत समितीमध्ये सहाय्यक स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत आहे. संस्था, संस्थेतील कर्मचारी वर्ग अतिशय मनमिळाऊ व मेहनती आहेत.
विद्यार्थी-2
हेमंत रावसाहेब रावले
मी हेमंत रावसाहेब रावले रा. कळवण ता. कळवण जि. नाशिक, आदर्श टेक्नीकल एज्यु. सोसायटी, कळवण येथे १ वर्ष मुदतीचा बांधकाम पर्यवेक्षक हा अभ्यासक्रम पुर्ण केला.
शासकिय ठेकेदारीचे प्रमाणपत्र मिळवून यशस्वीरीत्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झालेलो आहे. व चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ ही मिळत आहे. संस्था ग्रामीण भागात असुनही, चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली आहे.
विद्यार्थी-3
हेमंत साळवे
मी हेमंत साळवे रा. रामनगर ता. कळवण जि.नाशिक, संस्थेमध्ये बांधकाम पर्यवेक्षक हा एक वर्षाचा व्यवसाय अभ्यासक्रम पुर्ण केला. माझे वडील पी.डब्लु. डी. मध्ये रोलर ड्राईव्हर होते.
त्यांचा आकस्मित मृत्यु झाल्यामुळे मी कळवण येथील पी.डब्लु. डी. ऑफिसमध्ये अनुकंपातत्वावर सहाय्यक स्थापत्य अभियंता म्हणून नोकरी करीत आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे व ८०% भाग आदिवासी असल्याने संस्था नेहमी गरीब मुलांना सहकार्य करीत असते.
विद्यार्थी-4
युवराज नानाजी निकुंभ
मी युवराज नानाजी निकुंभ रा. कळवण ता. कळवण जि. नाशिक, संस्थेत डिप्लोमा इन इलेक्ट्रीशियन हा २ वर्ष मुदतीचा व्यवसाय अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगार करुन आर्थिक लाभ चांगल्याप्रकारे मिळवीत आहे. विद्युत उपकरणे दुरुस्ती आणि घरगुती वायर फीटींगची कामे करीत आहे. माझ्याकडे चार माणसे कामाला आहेत.
विद्यार्थी-5
ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे
मी ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे रा. रामेश्वर ता. देवळा जि. नाशिक, मी सांगु ईच्छितो की, मी इलेक्ट्रीशियन हा २ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन, कादवा सहकारी साखर कारखाना ता. दिंडोरी, येथील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगच्या डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. इलेक्ट्रीकल क्षेत्रात बी. ई. होण्याचा माझा मानस आहे. संस्थेचे वर्कशॉप प्रशस्त व साधनसामग्रीने युक्त आहे. आणि शिक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रॅक्टीकलचा सराव करुन घेतात.
विद्यार्थी-6
पुष्कर पवार
मी पुष्कर पवार रा. सटाणा जि. नाशिक येथील रहीवासी असुन मी गरीब कुटूंबातील आहे. या संस्थेत मी डिप्लोमा इन इलेक्ट्रीशियन हा २ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन यशस्वीरीत्या स्वयं रोजगार करीत आहे. विद्युत उपकरणांची दुरुस्ती, घरे व बंगल्यांची लाईट फिटींग तसेच पॅनल बोर्ड बनविण्याचे कामेही मी करीत आहे. पॅनल बोर्ड फिटींगची कामे करण्यासाठी मला दुबईहून ऑफर आली आहे. माझ्याकडे ५/६ जणांचा ग्रुप आहे.