आमच्या बद्दल
आदर्श टेक्निकल एज्युकेशन सोसायटी कळवण संचालित स्वामी विवेकानंद व्यवसाय शिक्षण/प्रशिक्षण केंद्र मनुर (कळवण). ही नाशिक जिल्ह्यातील कळवण सारख्या आदिवासी भागात काम करणारी एक लोकप्रिय व्यवसाय प्रशिक्षण संस्था आहे. शिखराच्या उंच टोकापर्यंत पोहोचणाऱ्या या संस्थेला गेल्या अकरा वर्षाचा इतिहास आहे. इतिहास सांगतो की आदर्श टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची स्थापना उत्साही व अभ्यासू सामाजिक कार्यकर्त्यांमधून निर्माण झालेली आहे. ही संस्था आज मानुर (कळवण) व लासलगाव (निफाड) या दोन तालुक्यांमध्ये कार्य करते.युवकांमध्ये कौशल्य निर्मिती करून कुशल कारागीर बनवते. सध्या संस्थेमध्ये व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 130 पर्यंत पोहोचलेली आहे. गेल्या अकरा वर्षांमध्ये जवळपास 600 ते 700 विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण केंद्रात शिक्षण/प्रशिक्षण घेतलेले आहे. इतिहास सांगतो की या संस्थेचे निर्मितीचे श्रेय शिक्षण सेवक व सामाजिक कार्यकर्ते श्री दगडू रामचंद्र सोनवणे, विष्णू रामचंद्र जाधव, हितेश सोनवणे, श्री सुभाष देवघरे आणि रामदास तुळशीराम पवार यांच्या सामाजिक कार्यातून झालेली आहे. परंतु यात श्री दगडू रामचंद्र सोनवणे यांची धडपड वाखाणण्या जोगी आहे. खरे श्रेय दगडू सरांचेच आहे असे मानावे लागेल.’विना–कौशल्य नाही भविष्य‘ हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षात घेता, या बेरोजगार तरुणांनी प्रशिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे अशीच संस्थेची इच्छा आहे.अजाची वाढती लोकसंख्या आणि बेरोजगार तरुणांची होणारे ससे होलपट पाहून, सुशिक्षित बेरोजगारांनी पारंपारिक शिक्षणाकडे ओढ न घेता त्यांनी व्यवसाय प्रशिक्षणाकडे वळाले पाहिजे आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन आपण आपल्या जीवनाचा पाया भक्कम केला पाहिजे.
संस्थापक
मी श्री. दगडू रामचंद्र सोनवणे रा. कळवण संस्थेचा फाऊंडर सदस्य असुन, संस्थेचा अध्यक्ष आहे. पदवी मिळूनही केवळ अपंगत्वामुळे नोकरीस अपात्र ठरल्याने व सामाजिक कार्याची आवड असल्याने तसेच कळवण तालुका हा ८०% आदिवासी भाग असल्याने आदिवासी मुलांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करणे, त्यांना इंग्रजी व गणित विषयाचे ज्ञान निर्माण करणे यासाठी .. १९७४ मध्ये कोचिंग क्लासेसची स्थापना केली. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातुन अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरी मिळणेसाठी मार्गदर्शन करणे, त्यांना व्यसायभिमुख बनविणे अशा प्रकारचे कार्य १९९६ पर्यंत केले. या कालावधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातुन, हुंडा विरोधी मोहिम, रक्तगट तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर, वृक्षारोपन असे विविध उपक्रम हाती घेतले. बेरोजगारीची समस्या वाढल्यामुळे व्यवसाय प्रशिक्षणाच्या मार्गातुन या आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरीवर विसंबुन न राहता व्यवसायभिमुख बनुन स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनन्यासाठी आदर्श टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना दि. २०/१२/२०१२ रोजी करण्यात आली.
सचिव माहिती
आदर्श टेक्निकल व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे अधिकृत संकेतस्थळावर माझे हार्दिक अभिनंदन. आणि स्वागत करताना मला त्या आनंद होत आहे. स्वामी विवेकानंद व्यवसाय शिक्षण/प्रशिक्षण केंद्र मानूर (कळवण) ही बेरोजगार तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे.
संस्थेचे सर्व व्यवसाय शिक्षण देणारे निर्देशक तज्ञ व अनुभवी आहेत. त्यामुळे मी श्री हितेश दगडू सोनवणे अभिमानाने सांगू इच्छितो की, ज्याप्रमाणे एखाद्या ओबडधोबड दगडा पासून मूर्तिकार मूर्ती निर्माण करतो. त्याचप्रमाणे आमच्या या शिक्षण संस्थेत शिकणारा युवक, चांगल्या प्रकारे व्यवसायाचे ज्ञान घेऊन नोकरीसाठी तत्पर होतो. किंवा व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय भिमुख बनतो आणि समाजामध्ये आपला पाय घट्ट रोऊन उभा राहतो.
संस्थेविषयक प्राचार्य मनोगत
विद्यार्थी मित्रांनो,
आदर्श टेक्निकलच्या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. जागतिकीकरणाच्या जगात भारताला कुशल कामगार निर्माण करण्याची गरज आहे. हे आव्हान स्वीकारण्याच्या प्रयत्नात आम्ही युवकांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणाद्वारे सशक्त बनवण्याचा आमचा दृष्टिकोन निश्चित केला आहे. आमच्या प्रशिक्षण केंद्रात चालणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तांत्रिक अभ्यासक्रम असो किंवा पॅरामेडिकल अभ्यासक्रमातून असो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना उद्योगाची उत्पादकता सुधारण्यासाठी अधिक व्यावहार्य उपाय प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण देतो. शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाच्या सीमा वरती भागात संशोधनाला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे. प्रशस्त इमारत सुसज्ज वर्कशॉप व त्यातून मिळणारे सखोल प्रशिक्षण त्याचबरोबर सर्व प्रकारचे प्रॅक्टिकल्स व त्यांचा सराव या शिवाय जनमाणसात युवकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते.
याशिवाय सर्व प्रकारच्या आस्थापना, मोठमोठ्या कंपन्या किंवा सर्व प्रकारच्या प्लेसमेंट विषयी माहिती देऊन विद्यार्थी घडवण्यावर विशेष भर दिला जातो.
तुम्हाला कळविण्यास मला आनंद होत आहे की आमच्या प्रशिक्षण केंद्रातून अनेक विद्यार्थी सरकारी आस्थापना, कंपन्यांमध्ये नोकरी करीत आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे व्यवसाय सुरू केलेला आहे. प्रशिक्षणा व्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थी समाजाशी कसा जोडला जाईल. याविषयी आमचे वैयक्तिक लक्ष असते. यासाठी आमची संस्था मोठमोठ्या नावाजलेल्या विद्वानांची व्याख्याने, वृक्षारोपण, रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर, श्रमदान असे अनेक कामे करून सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे कार्यकर्ते. आपल्या उज्वल भविष्यासाठी मी श्री वामन सिताराम गावित प्राचार्य या नात्याने पुढील प्रवासाची शुभेच्छा देत आहे.
संस्थेचे विजन (VISION)
आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षण किंवा उच्च तंत्रज्ञान योग्य प्रकारे मिळवून देणे. हाच दृष्टिकोन संस्थेने ठेवला आहे. यासाठी संस्थेने अनेक गोष्टी करण्याचे ठरविले आहे. तसे निवासी व्यवस्था केल्यास, हे गरीब विद्यार्थी अल्पकालीन का होईना, व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपला भविष्यकाळ उज्वल करतील. यासाठी संस्थेला विस्तृत स्वरूपात कार्य करावे लागेल. पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे लागतील. या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेने एक आराखडा बनविला आहे. व त्यानुसार कार्य करीत आहे.
संस्थेचे ध्येय (AIM)
आपल्या देशातील वाढती लोकसंख्या जगातील वाढलेली औद्योगिक क्रांती आणि त्याच्यात बेडसवणारी बेरोजगारांची समस्या. या सर्व बाबींचा विचार करता. आपल्या देशात कुशल कामगारांची निर्मिती करणे बेरोजगार तरुणांना त्यांचा पायावर उभे करणे हे संस्थेचे ध्येय आहे.
संस्थेचे मिशन (MISSION)
नाशिक जिल्ह्यात कळवण, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, सटाणा. हा भाग प्रामुख्याने आदिवासी भाग आहे. अनियमित पाऊस व डोंगराळ भाग असल्यामुळे येथील शेती उद्योग बेताचाच आहे. त्यामुळे आदिवासी लोकांना केवळ मजुरी करूनच आपला उदरनिर्वाह करावा लागतो आर्थिक दृष्ट्या या भागातील विद्यार्थी उच्च व तांत्रिक शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या जीवनाचा योग्य मार्ग मिळू शकत नाही. योग्य प्रकारे त्यांना समोदेशन करून, प्रोत्साहित करून, व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन, कुशल कारागीर बनवून. मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य संस्था करीत आहे. त्यासाठी त्यांना कमी कालावधीचे तसेच दीर्घ कालावधीचे प्रशिक्षण निर्माण करून देणे हे संस्थेचे मिशन आहे.
आमचे वैशिष्ट्य
२) कोणत्याही व्यवसाय अभ्यासक्रमासाठी टक्केवारीची अट नही.
३) मुळ दाखला नसल्यास दाखल्याच्या दुसऱ्या प्रतीवर प्रवेश घेतला येईल.
४) खाजगी व्यवसाय करणारे परंतु १० वी पास असलेल्या आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच १० वी / १२ वी पास होऊन जे विद्यार्थी बेरोजगार असतील व काही कारणास्तव शिक्षणात खंड पडला असेल तरी, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश घेता येईल.
५) I. T. I. प्रमाणे सर्व अभ्यासक्रम NSQF लेव्हलचे आहेत.
६) शासकिय I. T. I. प्रमाणे विद्यार्थ्यांना रेल्वे, वीज महामंडळ किंवा इतर मोठ्या कंपन्यां मध्ये अप्रेंटिसशिप करता येईल.
७) सर्व शासकिय, निमशासकिय आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व कंपन्यांमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ५% जागा आरक्षीत आहे.
८) बांधकाम पर्यवेक्षकाच्या विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियंता म्हणून जिल्हा परिषद, महानगर पालिका, पंचायत समिती, P. W.D. नगर पंचायतमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. ९) इलेक्ट्रीशियन हा कोर्स पुर्ण केल्यावर P.W.D. चे वायरमन व सुपरवायझरचे लायसन्स काढता येते.
१०) दोन वर्षांचा अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो.
११) ११ वी / १२ वी न करता, २ वर्षाचा कोर्स केल्यानंतर जे सर्टीफिकेट मिळते त्याची किंमत १२ वी पास सर्टीफिकेट इतकीच असते, म्हणून त्यांना B.A. किंवा B.Com. या प्रथम वर्षात प्रवेश मिळतो.
१२) D. M. L. T. या कोर्सेला पॅरामेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणीपात्र आहे
१३) आरोग्य कर्मचारी पुरुष, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम आहे
१४) सर्व प्रकारचे प्रात्यक्षिक (Pratical) विद्यार्थ्यांकडुन चांगल्याप्रकारे करुन घेण्यासाठी सुसज्ज वर्कर्शाप.
आम्ही काय करतो
१) येण्याजाण्यासाठी एस.टी. पास ची सोय केली.
२) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ॲप्रेंटीसशिप पूर्ण करण्यासाठी (पुर्वी या व्यवसाय अभ्यासक्रमांना ॲप्रेंटीसशिपची सोय नव्हती) संस्थेने विद्यार्थ्यांसाठी ॲप्रेंटीसशिप ॲक्ट पास करुन घेतला. आता या विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकिय व निमशासकिय विभागात ५% जागा आरक्षीत आहेत.
३) कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटची सोय करण्यात आली.
४) संस्थेतील सर्व पायाभूत सुविधा (फर्निचर, यंत्रसामग्री) कुणाचीही मदत न घेतला आपल्या स्वकर्तृत्वावर निर्माण केली.
५) स्वत:च्या कर्तृत्वावर आता १५ ते २० लक्ष रुपयांची यंत्रसामग्री संस्थेकडे आहे.
६) संस्थेने २ एकर जागा खरेदी केलेली आहे. आर्थिक अडचणीमुळे खरेदी झालेली नाही.
आपण आदर्श टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी कळवण संचलित, स्वामी विवेकानंद व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मानूर, प्रशिक्षणासाठी केंद्राची निवड का करावी ?
- स्वामी विवेकानंद व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मानूर येथील इलेक्ट्रीशियन, मोटर मेकॅनिक आणि बांधाकाम पर्यवेक्षक या अभ्यासक्रमाचे वर्कशॉप प्रशस्त व साधन सामग्रीने परिपूर्ण आहे.
- प्रशिक्षण देणारे शिक्षकवृंद तज्ञ व अनुभवी आहेत.
- प्रशिक्षणाचा लाभ घेऊन बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरु केला आहे. किंवा अनेक विद्यार्थी शासकिय/निमशासकिय कार्यालयात सेवेत आहेत.
- गेल्या १० वर्षात संस्थेमध्ये जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. व प्रशिक्षणात गुणवत्ता प्राप्त केली आहे.
- प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट साठी (नोकरी) किंवा अप्रेंटिसशिप मिळणेसाठी प्रयत्न करते. या साठी विविध कंपन्यांचे मेळावे घेतले जातात किंवा अनुभवी तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केले जातात.