कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम परवेशक):

कौशल्य विकासाचे शिक्षण म्हणजेच आपल्या जीवनाचा आधारस्तंभ.

अभ्यासक्रम:

शैक्षणिक पात्रता:- किमान दहावी पास. टक्केवारीची अट नाही.

कालावधी:- एक वर्ष.

 

अभ्यासक्रम विषयक माहिती:

या व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने तीन विषय असतात.

1) बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन.

2) इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग.

3) सर्वेईंग अँड लेव्हलिंग.

या व्यतिरिक्त तीनशे मार्गाचे प्रॅक्टिकल्स असते.

अभ्यासक्रमाचे महत्त्व:

प्रमोशन साठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्थापत्य अभियंता म्हणून नोकरी करता येते किंवा गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिपचे लायसन्स काढून कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू करता येते.

नोकरी विषयक संधी:

1) जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, जलसंपदा कार्यालय, पीडब्ल्यूडी कार्यालय यामध्ये स्थापत्य अभियंता म्हणून नोकरी मिळवता येते.

2) जिल्हा परिषद चे ७½ लाखाचे व पीडब्ल्यूडी चे १० लाखापर्यंतचे    गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शिफ्टचे लायसन्स काढून आपला व्यवसाय सुरू करता येतो.

3) ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी हा व्यवसाय अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा आहे.

माजी विद्यार्थी

विद्यार्थी-1

किशोर नानाजी शेवाळे

मी किशोर नानाजी शेवाळे रा. मोकभणगी ता. कळवण जि. नाशिक मनोगत व्यक्त करतो की, माझे वडील पी.डब्लु. डी. मध्ये मैलबिगारी होते. अचानक त्यांचा मृत्यु झाला.
मी पोरका झालो. त्यानंतर मी संस्थेत आर्कीटेक्ट ड्रॉप्समन हा २ वर्षे मुदतीचा अभ्यासक्रम पुर्ण केला व अनुकंपा तत्वाखाली चांदवड ता. चांदवड जि. नाशिक येथे पंचायत समितीमध्ये सहाय्यक स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत आहे. संस्था, संस्थेतील कर्मचारी वर्ग अतिशय मनमिळाऊ व मेहनती आहेत.

विद्यार्थी-2

हेमंत रावसाहेब रावले

मी हेमंत रावसाहेब रावले रा. कळवण ता. कळवण जि. नाशिक, आदर्श टेक्नीकल एज्यु. सोसायटी, कळवण येथे १ वर्ष मुदतीचा बांधकाम पर्यवेक्षक हा अभ्यासक्रम पुर्ण केला.
शासकिय ठेकेदारीचे प्रमाणपत्र मिळवून यशस्वीरीत्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झालेलो आहे. व चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ ही मिळत आहे. संस्था ग्रामीण भागात असुनही, चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली आहे.

Open chat
1
Scan the code
Hello
Can we help you?