अभ्यासक्रम:
शैक्षणिक पात्रता १० वी पास
कलावधी – २ वर्ष
भारताने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती घडविलेली आहे. मोठमोठे कारखाने व विजेवर चालणारी उपकरणे रेल्वे, इलेक्ट्रीक वाहने, यांमध्ये क्रांती घडन आलेली आहे. त्यामुळे आजच्या युगातत शैक्षणिक क्षेत्रात केवळ मोठमोठ्या पदव्या घेऊन नोकरी मिळतेच असे नाही, यामुळेच बेरोजगारांची संख्या अफाट वाढळी आहे. सर्व क्षेत्रात म्हणजेच सरकारी असो वा निमसरकारी असो, इलेक्ट्रीशियन, वायरमन किंवा लाईनमन यांची प्रचंड मागणी आहे. शासकिय आय. टी. आय. मध्ये इलेक्ट्रीशियन / वायरमन साठी प्रवेश मिळतो. त्यासाठी किमान ७५% ते ८०% मार्क्स आवश्यक असतात. ज्यांना एवढी टक्केवारी मिळालेली असते त्यांना आय. टी. आय. मध्ये प्रवेश मिळतो. परंतु ज्यांना ४५% ते ७०% मार्क्स असतात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पदव्या घेऊन काय करावे ? अशा विद्यार्थ्यांसाठी हि सुवर्णसंधी आहे. इलेक्ट्रीशियन आणि वायरमन व्हा, आणि आपले भविष्य उज्वल बनवा. जर इलेक्ट्रीशियन झालात व नोकरी मिळाली नाही परंतु पकड, एक टेस्टर, एक स्क्रू ड्रायव्हर जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही किमान ५०० रु. रोज सहजगत्या कमावू शकतात..
ठळक वैशिष्ट्ये :
१) शाळा सोडल्याचा दाखल्याची मुळ प्रत नसल्यास, दाखल्याच्या दुसऱ्या मुळ प्रतीवर प्रवेश घेतला येतो.
२) १० वी नंतर किंवा १२ वी नंतर गॅप किंवा खंड पडलेल्यांना सुद्धा प्रवेश घेतला येईल.
३) आय.टी.आय. व व्यवसाय प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाची NSQF Level सारखीच आहे.
४) शासकिय व निमशासकिय क्षेत्रात ५% जागेचे आरक्षण आहे.
५) वय व टक्केवारीची अट नाही.
नोकरी विषयक संधी :
१) विद्युत मंडळामध्ये नोकरी करण्याची संधी
२) आय. टी. आय. प्रमाणे ॲप्रेन्टीसशिपची सोय
३) मोठमोठ्या कंपन्यांमध्ये १००% नोकरी मिळतेच
४) स्वत:चा उद्योग सुरु करुन मालक बना.
माजी विद्यार्थी
विद्यार्थी-1
युवराज नानाजी निकुंभ
मी युवराज नानाजी निकुंभ रा. कळवण ता. कळवण जि. नाशिक, संस्थेत डिप्लोमा इन इलेक्ट्रीशियन हा २ वर्ष मुदतीचा व्यवसाय अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगार करुन आर्थिक लाभ चांगल्याप्रकारे मिळवीत आहे. विद्युत उपकरणे दुरुस्ती आणि घरगुती वायर फीटींगची कामे करीत आहे. माझ्याकडे चार माणसे कामाला आहेत.
विद्यार्थी-2
ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे
मी ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे रा. रामेश्वर ता. देवळा जि. नाशिक, मी सांगु ईच्छितो की, मी इलेक्ट्रीशियन हा २ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन, कादवा सहकारी साखर कारखाना ता. दिंडोरी, येथील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगच्या डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. इलेक्ट्रीकल क्षेत्रात बी. ई. होण्याचा माझा मानस आहे. संस्थेचे वर्कशॉप प्रशस्त व साधनसामग्रीने युक्त आहे. आणि शिक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रॅक्टीकलचा सराव करुन घेतात.